बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहेत. असं असताना या घटनेचा राजकीयवर्तुळात वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणेचा मास्टरमाईंड धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर कारवाई सुरु आहे.
या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक तसेच सत्ताधारी मित्रपक्षातील काही नेते यांच्याकडून केली जात आहे. अशातच धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा मिळत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे. यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अजित पवार हे नेते नाहीत...
याचपार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की, अजित पवार हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत... अजित पवार हे अॅक्सिडेंटल नेते आहेत. भाजपच्या ईव्हिएमच्या कृपेने त्यांना जागा मिळालेल्या आहेत. स्वत:च्या कर्तृत्वावर नाही... जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते, तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असत, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही, असं म्हणतं संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.