ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नाही तर अमित शाह...; - संजय राऊत

संजय राऊत यांनी भाजपा - शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. शिवसेना फोडल्यानंतरच महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जायला लागले.

Published by : Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी भाजपा - शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. शिवसेना फोडल्यानंतरच महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जायला लागले. महाराष्ट्राचा दिल्लीतील आवाज कमजोर झाला. एकनाथ शिंदे यांच्यावरही ईडीचा दबाव आला. उद्धव ठाकरेंसमोर शिंदे कसे रडले हे मलाही माहीत आहे. आमचं म्हणणं होतं आपण खंबीर राहिलं पाहिजे. हे ही दिवस निघून जातील. आपण घाबरता कामा नये. पण आता हे लोक मोठा आव आणत आहेत. डरकाळी फोडत आहेत. गर्जना करत आहेत. पण त्यांच्या या पोकळ गर्जना आहेत. भविष्यात भाजप यांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात झाली आहे. भाजपला महाराष्ट्राचा आवाज उठवणारा पक्ष आणि संघटना नकोय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नाही. भाजपचे नेते अमित शाह आणि दिल्लीतील भाजप नेत्यांनीच शिवसेना फोडली आहे. 'एकनाथ शिंदे यांच्यावर ईडीचा दबाव होता. असे संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा