ताज्या बातम्या

काँग्रेसच्या विशाल पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले..

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सांगली मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात तिढा पाहायला मिळत आहे. यातच सांगली ही काँग्रेसचीच आहे आणि ती आपण सोडायची नाही असे म्हणत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे.

यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, विशाल पाटील कोणत्या पक्षातून लढणार आहेत. त्यांचे एक भाषण मला आज सकाळी कुणीतरी ऐकवलं. त्यांचे पायलट आहेत कुणीतरी एक. ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन. आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल. ते विमान फक्त गुजरातच्या दिशेनं जाऊ नये. एवढीच आम्हाला चिंता आहे.

अनेकदा विमानं भरकटतात आणि गुजरातच्या दिशेनं जातात. गुजरातलाच विमान उतरु शकते. पायलटशी चर्चा करु. पायलटला नीट ट्रेनिंग देऊ. दिल्लीतल्या काँग्रेसच्या वरिष्ठांनी काल आमच्याशी चर्चा केली. काय चर्चा झाली हे आम्हाला माहिती आहे. असे संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य