Admin
Admin
ताज्या बातम्या

संजय राऊत यांनी सांगितले फडतूस म्हणजे काय? त्याचे चार अर्थ; म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

फेसबुक पोस्ट टाकल्याने ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिलेला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. ते प्रकरण सध्या प्रचंड गाजत आहे. त्याच प्रकरणावरून उध्दव शिवसेना ठाकरे गटप्रमुख उध्दव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती.

पत्रकार परिषदेत बोलताना उध्दव ठाकरेंनी फडणवीसांवर विखारी टीका केली. ते म्हणाले होते की, एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. केवळ उपमुख्यमंत्रीपद मिरवलं आणि चमकायचं हेच ते करत आहेत. फडतूस गृहमंत्र्याला पदावर बसण्याचा अधिकार नाही. स्वतःच्या घरात काही झालं की एसआयटी नेमायची. हे गुंड मुख्यमंत्री आहेत का? गुंड मंत्री असं एक खातं आता त्यांनी या सरकारमध्ये सुरु केलं पाहिजे. ताबडतोब गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका उध्दव ठाकरेंनी केली होती.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याला प्रतिउत्तर दिले की, मी फडतूस नाही काडतूस आहे. मी गृहमंत्री आहे, याचीच अनेकांना अडचण आहे. पण मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. बेकायदेशीर काम करणाऱ्यांना तुरुंगात टाकणारच असे ते म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राऊत म्हणाले की, तुम्ही काडतूस असाल हो, अशी भिजलेली काडतूसं महाराष्ट्रात आम्ही खूप पाहिली आहेत. भिजलेली काडतूसं महाराष्ट्रात उडत नाहीत. डिक्शनरीत फडतूसचा शब्दाचा अर्थ दिलेला आहे. वर्थलेस. मिनिंगलेस, यूजलेस आणि बिनकामाचे लोक आहेत, असा अर्थ डिक्शनरीत आहे. असे म्हणत राऊत यांनी हल्लाबोल केला.

तसेच ते पुढे म्हणाले की, हे सरकारच बिनकामाचं आहे. गृहमंत्री झाल्याची काही लोकांना अडचण आहे, असं फडणीस म्हणाले. हो तुम्ही अडचणच आहात महाराष्ट्रालाअसं सरकार ज्या राज्यात आहे त्या सरकारलाच सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटलं आहे. असे राऊत म्हणाले.

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Daily Horoscope 08 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मेहनतीचं आवक फळ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल