ताज्या बातम्या

ईडीने बातमी देण्याऐवजी मुलुंडचा पोपटलाल जाहीर करतो; संजय राऊतांचा हल्लाबोल!

सदानंद कदम यांना काल ईडीने अटक केली. तसेच आज हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर पुन्हा ईडीची धाड पडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सदानंद कदम यांना काल ईडीने अटक केली. तसेच आज हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर पुन्हा ईडीची धाड पडली आहे. पहाटे 4 ते ५ अधिकाऱ्यांचे पथक मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहे. दीड महिन्यात ईडीने दुसऱ्यांदा मुश्रीफांच्या घरी धाड टाकली आहे.

ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन तपासणी सुरू केली आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल ईडीचे अधिकारी खेडला गेले आणि कदम यांना अटक केली. त्यांना अटक केल्याची बातमी ईडीने देण्याऐवजी मुलुंडचा पोपटलाल जाहीर करतो. तसेच हसन मुश्रीफांवरील एफआयआरची कॉपी सर्व प्रथम सोमय्यांना मिळते. याचा अर्थ नेमका काय? कदम यांना काल अटक झाली. मात्र, त्यांच्या अटकेआधी त्यांना अटक होणार हे आमचे मुलुंडचे पोपटलाल बोलत होते. या सर्व प्रकारावरुन संजय राऊत यांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला

Rapido Bike : रॅपिडो बाईकला खुद्द परिवहन मंत्र्यांनी पकडले; परिवहन विभागाकडून मंत्र्यांना खोटी माहिती

Sonu Sood : "तुम्ही नंबर पाठवा..."; लातूरमधील 'त्या' शेतकरी कुटुंबाला सोनू सूदचा मदतीचा हात

Property Donate To Temple : मुलींकडून अपमानास्पद वागणूक; निवृत्त जवानाचा टोकाचा निर्णय, 4 कोटींची संपत्ती केली दान