ताज्या बातम्या

Sanjay Raut On PM Modi: ते देवच आहेत, मी त्यांना माणूस मानत नाही! राऊतांचा मोदींवर खोचक टोला

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर खोचक टोला लगावत म्हटलं, 'ते देवच आहेत, मी त्यांना माणूस मानत नाही.' महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.

Published by : Prachi Nate

सध्या राजकीयवर्तूळात मविआ आणि महायुती या दोन्ही गटाकडून एकमेकांवर घणाघाती टीका केल्या जात आहेत. अशातच महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना म्हटलं आहे की, ते मुंबईसह नागपूरपर्यंत स्वबळावर निवडणूक लढणार. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमावायचे आहेच. आम्ही स्वबळावर लढणार आहोत, अशी घोषणा संजय राऊतांनी केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान देवच आहेत.. असं म्हणत संजय राऊतांनी मोदींवर टोलेबाजी केली आहे.

पंतप्रधान मोदी नेमक काय म्हणाले होते

निखिल कामथ यांच्यासोबतचा पंतप्रधान मोदींचा कालचा पॉडकास्ट 'पीपल विथ द प्राईम मिनिस्टर' प्रसिद्ध झाला. दरम्यान पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होत की, मी देखील माणूस आहे माझ्याकडून पण चुका होऊ शकतात... माणसाच्या जीवनात चुका अपरिहार्य आहेत. मोदींनी केलेल्या या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे गटाते खासदार संजय राऊतांनी टोला लगावत मोदींवर निशाणा साधला आहे.

ते देवच आहेत..- संजय राऊत

संजय राऊत म्हणाले की, मी त्यांना माणूस मानत नाही, ते देवच आहेत.. देव हा देव असतो, एकदा जर हे घोषित केले की ते देवाचा अवतार आहेत तर मग ते माणूस कसे होती... ते विष्णूचे तेरावे अवतार आहेत, त्यांनी स्वतःच हे म्हटले होते... त्यांच हे म्हणं एकलं देखील होत सगळ्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आता परत तेच म्हणत आहेत मी माणूस आहे... काही तरी गडबड आहे केमिकल लोचा आहे... असं म्हणत राऊतांनी पंतप्रधान मोदींवर खोचक टोला लगावला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश