पुण्याची जागा कोण लढवणार यावरुन आता चर्चा रंगल्या आहेत. राजकीय वर्तुळातून यावर आता प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसला या जागेवर सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.
यावरुनच आता संजय राऊत यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे की, “कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्तर ठरले तर ‘कसबा’प्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा या सूत्राने महाराष्ट्र व देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकानं थोडा थोडा त्याक करावाच लागेल. जय महाराष्ट्र”, असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.