ताज्या बातम्या

Sanjay Raut : या देशात आपल्याला हुकूमशाहीविरोधात लढताना काही गोष्टी स्विकाराव्या लागतात, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो

आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत सांगली, भिवंडीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला संजय राऊत म्हणाले की, ज्यार्थी आम्ही एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत आहोत. तीन पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष. त्याअर्थी आमच्या दृष्टीने कोणताही वाद उरलेला नाही. एकत्र बसू आणि चर्चा करु. आघाडीमध्ये एखाद - दुसऱ्या जागेवरुन शेवटपर्यंत चर्चा होत असतात आणि ते अपेक्षित आहे. अनेकवर्ष वेगवेगळ्या पद्धतीने काम करताना आपण एकत्र येतो. प्रत्येक जागेवरती आमचे कार्यकर्ते काम करत असतात. सांगलीसुद्धा मी मानतो की भिवंडीसुद्धा मानतो. काँग्रेस तिकडे अनेकवर्ष लढत आली. मी विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोन्ही सांगलीकर नेत्यांच्या भावनेशी मी सहमत आहे. एक राजकीय कार्यकर्ता म्हणून.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, त्याचप्रमाणे भिवंडीतीलसुद्धा राजकीय कार्यर्त्यांच्या भूमिकांशी मी सहमत आहे. रामटेक, अमरावती, कोल्हापूर इथे आमच्या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्या. तेथील शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत जागा सोडण्यासंदर्भात त्यांच्याशी मी सहमत आहे. शेवटी या देशात आपल्याला हुकूमशाहीविरोधात लढताना काही गोष्टी स्विकाराव्या लागतात आणि काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. असे संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : भयंकर! क्रीडा शिक्षकांची शाळेतील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; पालकांमध्ये तीव्र संताप

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेसेज

Iraq Mall Fire : इराकमधील मॉलमध्ये भीषण आग; 50 जणांचा मृत्यू

Jitesh Sharma : लॉर्ड्समध्ये RCB स्टार जितेश शर्माला सुरक्षारक्षकाने अडवलं; दिनेश कार्तिकने केली मदत