ताज्या बातम्या

Sanjay Raut | कोट्यवधी मतदारांना कोणी वेश्या म्हणतं असेल तर... संजय राऊत गायकवाडांवर कडाडले

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संजय राऊत कडाडले. मतदारांना वेश्या म्हणणं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी असल्याचं राऊत म्हणाले. अजित पवार यांच्यावरही निशाणा.

Published by : shweta walge

बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. विधानसभा निवडणुकीत मतदार दोन-दोन हजारात विकले गेले तुमच्यापेक्षा तर रांxx बऱ्या" असे वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलय. यावरुन आता उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी संजय गायकवाड आणि अजित पवार यांना धारेवर धरलं.

काय म्हणाले संजय राऊत?

मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, लोकशाहील कोणी रखेल म्हणत असेल, संविधानाला कोणी गुलाम मानत असेल, सत्ताधारी पक्षाचे आमदारचं अशी वक्तव्य करत असतील तर ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे. 2-2 हजारांना मतदार विकत घेतले , मतदारांना उद्देशून असं अश्लील बोलणं, वेश्या म्हणणं यावर विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल यांनी मत व्यक्त केलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर कसं ओझं होतंय, कसा भार आहे, हे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नुकतेच बोलले . म्हणजे 1500 रुपये देऊन तु्म्ही मतं विकत घेतली, पण आता तुम्हाला सरकारी योजनेवर भार टाकणं जमत नाहीये, राज्य चालवता येत नाही, हे स्पष्ट दिसतंय.

दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांचा जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एका सत्कार कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला मतदान कमी मिळाले यामुळे खंत व्यक्त केली. जाहीर भाषणात आमदार गायकवाड हे मतदारांवर भडकले. त्यांनी मतदारांना शिवीगाळ केली, तर अजित पवार यांनी मतदारांना उद्देशून काही वक्तव्य केलं होतं. त्या सर्वांचा समाचार घेताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य