यापूर्वी जेव्हा संजय शिरसाट“ते काय लिहिणार, सगळे खोटं लिहितात, किमान एक गोष्ट तरी खरी सांगा,”असे म्हणत शिरसाटांनी राऊतांवर सडकून टीका केली होती. यावर हा पलटवार असल्याचे पहिले जात आहे, दरम्यान काल घाटकोपर मध्ये मराठी कुटुंबीयांवर गुजराती कुटुंबीयाने जी मारहाण केली. परप्रांतीयांचा मुंबईमधील वाढता प्रभाव या प्रकरणावर संजय राऊतांनी बोलणे टाळले.महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शीतयुद्ध चालूं असून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिरसाट यांच्यावर टीकास्त्र सोडलं असल्याचं पाहायला मिळत आहे. शिरसाट हे खोट बोलत असून कॉपी करणारे विद्यार्थी जसे पास होतात तसेच हे पण आहेत असे ते यावेळी म्हणाले आहेत.
"महायुतीचे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितले कि मी कधीही माझ्या कामाच्या बाबतीत नापास होऊ शकत नाही, मला आज ही उद्धव ठाकरे यांचे फोन येत असतात" पत्रकार परिषदेमध्ये विचारलेल्या या प्रश्नावर राऊत आक्रमक होत शिरसाट खोट बोलत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. कॉपी करून पास होणाऱ्या लोकांपैकी शिरसाट हे एक असून ते पण कॉपी करूनच पास झाले आहेत असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने हायजॅक केल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या लेखावर प्रतिक्रिया देताना सांगितले की आमची भूमिका आणि यांचा लेख यात हेच साम्य आहे देवेंद्र फडणवीसांनी लांड्या लबाड्या करून चोऱ्यामाऱ्या करून निवडणूक जिंकत आपला पक्ष स्थापन केला आहे. राहुल गांधी यांचा लेखातून ही हेच वास्तव त्यांनी मांडले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी जेव्हा संजय शिरसाट“ते काय लिहिणार, सगळे खोटं लिहितात, किमान एक गोष्ट तरी खरी सांगा,”असे म्हणत शिरसाटांनी राऊतांवर सडकून टीका केली होती. यावर हा पलटवार असल्याचे पहिले जात आहे, दरम्यान काल घाटकोपर मध्ये मराठी कुटुंबीयांवर गुजराती कुटुंबीयाने जी मारहाण केली. परप्रांतीयांचा मुंबईमधील वाढता प्रभाव या प्रकरणावर संजय राऊतांनी बोलणे टाळले.