ताज्या बातम्या

“राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं; संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्र

Published by : Siddhi Naringrekar

संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राला इतिहास आहे. पूर्वी एखाद्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यांवर न्यायालयाने थोडे जरी ताशेरे ओढले, तरी ते राजीनामा देत होते. बॅरिस्टर अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशी अनेक उदाहरणं आहेत. मात्र, एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आली. तेही पुराव्यासह तरीही सरकार ठंब्याप्रमाणे बसून आहे. असे राऊत म्हणाले.

यासोबतच राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं असून रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे येत असताना हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं बसून आहे. “काही दिवसांपूर्वी आम्ही नागपूरमध्ये होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही तिथे उपस्थित होते. सरकारचा गोंधळ आम्हाला जवळून बघता आला. मुळात हे सरकार अस्तित्वातच नाहीये. रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येत आहेत. असे म्हणत राऊतांची सरकारवर हल्लाबोल केला आहे.

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

Rahul Narwekar : 'यामिनी जाधव यांना खरंच मदत झाली का?' काय म्हणाले राहुल नार्वेकर

Lok Sabha Election 2024: एकाच तरुणानं केलं चक्क 8 वेळा मतदान; व्हिडीओ व्हायरल...

माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन

Daily Horoscope 22 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणार; पाहा तुमचे भविष्य