ताज्या बातम्या

विरोधकांना मारुन टाकण्याचा डाव; राऊतांचा सरकारवर आरोप

खासदार संजय राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

खासदार संजय राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी चा मॅसेज खासदार संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला असल्याची माहिती मिळत आहे. हिंदू विरोधी असल्यामुळे मारून टाकू असा हा मॅसेज आहे. दिल्लीत आल्यावर AK 47 ने उडवून टाकू. मुसेवाला टाईपमध्ये मारु. लॅारेन्स के और से मॅसेज है, सलमान और तू फिक्स तयारी करके रखना. अश्लील शिवीगाळ करत हा मॅसेज करण्यात आलांय.

याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, सलमानला धमकी दिलेल्या गँगकडून मला धमकी देण्यात आली आहे. विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही असे राऊत म्हणाले. यासोबतच ते म्हणाले की, राज्यात दहशतवाद आणि दंगली सुरु आहे. मी बोललो तर राज्यात भूकंप येईल. याआधी मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांकडून मला धमकी देण्यात आली. मात्र गृहमंत्र्याकडून याची चेष्टा करण्यात आली. असे राऊत यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, संपूर्ण सुरक्षायंत्रणा ही गद्दार गटाच्या सुरक्षेसाठी आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजबारा उडाला आहे. मला आलेल्या धमकीबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. असे राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी