राज्यभरात महायुती सरकारतर्फे लाडकी बहीण योजना सुरू केली गेली. या योजनेअंतर्गत पात्र महिलेला दरमहा 1500 रुपये दिले जातात. हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. पण या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार आल्याचे अनेकदा बोलले गेले. त्यामुळे ही योजना बंद होणार की काय? असे प्रश्नदेखील उपस्थित राहिले.
त्याचप्रमाणे राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यास अडचणी आल्याबद्दलचा प्रश्न संजय राऊत यांना विचारला गेला. त्यावर त्यांनी लाडकी बहीण योजना जबाबदार असल्याचे म्हंटले. लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 8 हजार कोटी खर्च केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता राऊतांच्या या वक्तव्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.