आज पत्रकार परिषद घेत असताना संजय राऊत यांनी एकीकडे भाजपवर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातील उदय सामंत यांचे कौतूक करत बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. याचपार्श्वभूमिवर संजय राऊत म्हणाले की, "मी उदय सामंत यांच्या अभिनंदन करतो त्यांनी राजापूर मध्ये संयमाची भूमिका घेऊन, दोन समाजामध्ये एक तेढ निर्माण झाला होता तो संपवायचा प्रयत्न केला".
"कोकणात अशा दंगली कधी घडवल्या नव्हत्या. हे कालचे आलेले हिंदुत्वाच्या नावावर आणि दंगली घडवत आहेत. कोकणात हिंदू मुसलमान यांच्या नावावर, कोकणाची राख रांगोळी करायची आहे का? मी आज वाचलं उदय सामंत यांनी संयमाची भूमिका घेतली, राजापूर आणि रत्नागिरी भागात आणि त्यांनी दोन्ही समाजामध्ये जो तेढ काही लोकांनी निर्माण केला होता तो नष्ट केला", असं म्हणत संजय राऊत यांनी उदय सामंत यांचे कौतुक केले.
महाराष्ट्र नष्ट व्हावे म्हणून काही लोकांना सुपारी देऊन भाजपमध्ये पाठवले- संजय राऊत
"शेतकऱ्यांचे आत्महत्या वरती आमचे सर्व संघ चालक मोहनराव भागवत कधी बोलले ते दिसले का ? शिवसेना हिंदुत्ववादी संघ पक्ष आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी हे विषय घेऊन राजकारणात आलो. आम्ही लोकांच्या पोटावर आधी बोलतो, यांच्या पोटात अन्न नाही आणि हिंदुत्ववाद करत बसले आहेत". पुढे संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्र हा पेटवाला निघाले आहेत काहीजण अशाने या राज्याची राख रांगोळी होईल. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच हे राज्य नष्ट होईल".
"हे राज्य नष्ट व्हावं यासाठी काही लोकांना सुपारी देऊन भाजप मध्ये पाठवले आहे का? हे कालपर्यंत वीर सावरकरांना शिव्या घालत होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला हाफ चड्डी वाले म्हणून बोलत होते, देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांना शिव्या घालत होते, ते आज आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. हिंदू मुसलमान याला मटणाचा दुकान वेगळा आणि त्याला मटणाचा दुकान वेगळा देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर हे सहन कसे करतात. सर संघचालक यांना जर राष्ट्राची खरी चिंता असेल तर हे सहन कसे करतात असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे".