ताज्या बातम्या

Sanjay Raut Arrest : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? आणखी दोन ठिकाणी ED ची छापेमारी

मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी (Patra Chal land scam case) शिवसेना (shivsena) नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) ईडीकडून अटक करण्यात आली.

Published by : Team Lokshahi

मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी (Patra Chal land scam case) शिवसेना (shivsena) नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) ईडीकडून अटक करण्यात आली. मॅरेथॉन चौकशीनंतर ईडीने संजय राऊतांना अटक केली. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या भांडूप येथील मैत्री या निवासस्थानी धाड टाकली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. त्यानंतर ईडीने राऊतांना अटक केली. मात्र राऊतांची कोठडीत चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे राऊतांशी संबंधित दोन ठिकाणी ईडीच्या दोन पथकांनी धाडी मारल्या आहेत. ईडीने नेमक्या धाडी कुठे मारल्या याची माहिती मिळाली नाही.

मात्र, राऊतांशी संबंधित दोन ठिकाणी ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू असून या सर्च ऑपरेशनमधून बरीच माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिणामी या सर्व प्रकरणामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती. या कोठडीनंतर राऊत यांची आज पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. एकीकडे राऊतांची चौकशी सुरू असतानाच आज राऊत यांच्या संबंधित मुंबईतील तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संबंधितांना समन्स

दरम्यान, राऊत यांना अटक केल्यानंतर राऊत यांच्याशी संबंधितांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. या लोकांची पुन्हा चौकशी करून महत्त्वाची माहिती घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राऊतांची आणखी अडचण वाढू शकते. दरम्यान, स्वप्ना पाटकर या पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार असून त्यांनाही चौकशीला बोलावलं जाऊ शकतं, असं सांगितलं जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं

Raj Thackeray : 'आता हे जातीच कार्ड खेळणार...तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत'; राज ठाकरेंचा मराठी माणसाला सतर्क राहण्याचा इशारा

Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावलं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे