उद्धव ठाकरे आणि चंद्रकात पाटील यांच्या भेटी दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत माध्यामांशी संवाद साधताना म्हणाले की, "चंद्रकात पाटील आमचे मित्र आहेत.... चंद्रकात पाटील हे शिवसेना भाजपाच्या युतीमध्ये असल्यापासून समर्थक राहिले आहेत, ते मला माहिती आहे... विशेषतः शिवसेना भाजपाच्या युतीच्या संदर्भात जी जुनी पिढी होती.... आमच्यासारखं ज्यांनी एकत्र काम केलं, त्यामध्ये चंद्रकात दादांसारखे नेते होते.. कदाचित आता जे भाजपमध्ये बाहेरून हौसे, नवशे, गवसे आलेले आहेत, त्यांना २५ वर्षातल्या आमच्या युतीचे महत्त्व कळणार नाही... त्यांचा ना भाजपाशी संबंध, ना हिंदुत्वाशी संबध... असं म्हणत संजय राऊत यांनी महायुतीवर टीका केली आहे.