राज्यात आता 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरु झाली आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 'ऑपरेशन टायगर'वरुन संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल. मात्र आधीच ऑपरेशन रेड्याची शिंग झालेले आहे. अशा अफवा पसरत आहेत. कालच आम्ही आमच्या संसदेतील कार्यालयाचे उद्घाटन केलं.
आमचे सगळे खासदार उपस्थित होते ते 7 आकडा चुकीचा सांगत आहेत. त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा धरला पाहिजे. ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांनी स्वत:ची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, कसलं ऑपरेशन त्यांचे काय? माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचे ऑपरेशन करत आहेत. रोज त्यांचा अपमान होत आहे. हा जो शिंदे गट आहे तो भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अॅपेंडीक्स आहे. आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या अॅपेंडीक्सचं ऑपरेशन फडणवीस करत आहेत. त्याची तुम्ही काळजी घ्या. असे संजय राऊत म्हणाले.