ताज्या बातम्या

Sanjay Raut on Praful Patel : "तुमचे रंग आधी पाहा, तुम्हाला दाऊदचा हिरवा रंग लागलाय"

वक्फ विधेयकावरून राज्यसभेत चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली.

Published by : Siddhi Naringrekar

वक्फ विधेयकावरून राज्यसभेत चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली. त्यानंतर आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांनी आरशात पाहिलं पाहिजे. ज्याने आपल्या बापाच्या पाठित खंजीर खुपसला त्यांचे अख्खे आयुष्य काँग्रेस पक्षात मग शरद पवारांबरोबर. बापाच्या पाठित खंजीर खुपसणारा हा माणूस इतरांना बोलतो रंग बदलतात. आता या माणसावर काय बोलायचे मला भाजपची किव वाटते. समोर गृहमंत्री अमित शाह बसले होते. कोणते कोणते नमुने भारतीय जनता पक्षामध्ये आणले."

"ज्या प्रफुल्ल पटेलांवर नरेंद्र मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केलाय. दाऊदचा हस्तक इकबाल मिर्ची याच्याबरोबरचे व्यवहार केल्यामुळे त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया झाल्या. त्यांच्या संपत्त्या जप्त झाल्या. असा आरोप अलिकडच्या काळामध्ये कोणत्या राजकारण्यावर झाला नाही. देशाचा सगळ्यात मोठा दुश्मन पाकिस्तानात जो आसऱ्याला आहे. त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलचे संबंध. ते दाऊदच्या पक्षात पण जाऊन आलं. दाऊदच्या पक्षातून भाजपमध्ये आले. भाजपात का गेले संपत्ती वाचवायला. तुरुंगात जाण्याची भिती असल्यामुळे, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी दाऊदच्या सगळ्या संबंधासह भाजपात गेले."

"दाऊदचे हस्तक भाजपाने आपल्या पक्षात घेतलं. हे सगळे दलाल आहेत. तुमचे रंग आधी पाहा, नक्की तुमचा कोणता रंग आहे? तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागला आहे. प्रफुल्ल पटेलांना सांगतो माझ्या नादाला लागू नका. काल भाजपच्या लोकांना चमचेगिरी करुन दाखवत होते. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्या जर मी सगळा इतिहास काढला तर त्यांना महाराष्ट्र सोडून जावा लागेल. हे लोकं देवेंद्रजींच्या बाजूला बसणार काय लेव्हल आहे का? फडणवीसांची." असे संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य

Home Loan Intrest Rate : गृहकर्जदारांना दिलासा ! PNB, Indian Bank आणि Bank Of India ने केली व्याजदरात कपात

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'