देशाचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर केला. अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, कालच्या निवडणुकीत मध्यमवर्गीयांची मतं भाजपाला पडलेली नाहीत. ईव्हीएमच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांची मतं जी चोरलीत आणि त्याच्यामुळे मध्यमवर्गीय जो धक्क्यात आहे त्या मध्यमवर्गीयांना हे मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात या सगळ्या कागद्यावरच्या बजेटमधून लोकांना काय मिळतं काय मिळणार आहे यासाठी थोडावेळ द्यावा लागेल. आता फक्त जे अर्थजज्ञ आहेत त्यांची भाषणं आपण ऐकायची आहेत. त्यांनी केलेलं विश्लेषण वाचायचं आहे. प्रत्यक्षात काय होईल यासाठी थोडावेळ द्यावा लागेल. महाराष्ट्रासारख्या राज्याला काय मिळालं बिहारच्या तुलनेत. मोदींचं प्रत्येक बजेट हे राज्याच्या आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेलं असते.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत, बिहारवरती वर्षाव. जिथे भारतीय जनता पक्षाचे राज्य नाही, तिथे काहीतरी तोंडाला पानं पुसायची आणि पुढे जायचं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बजेट कळालं नाही आहे. बजेट समजण्यासाठी 72तास द्यावे लागतात. असे संजय राऊत म्हणाले.