ताज्या बातम्या

Sanjay Raut : “वक्फच्या 2 लाख कोटीच्या जमिनी घशात घालण्यासाठी हे विधेयक आणलंय”

वक्फ बोर्डासंदर्भातला विषय आमच्यासाठी संपलेला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

वक्फ सुधारणा विधेयकाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "वक्फ बोर्डासंदर्भातला विषय आमच्यासाठी संपलेला आहे. वक्फ बोर्डाच्या सुधारणा बिलाचा विषय हा शिवसेनेसाठी संपलेला आहे. त्यामुळे पुढे इंडिया आघाडी म्हणण्यापेक्षा काही लोकं कोर्टात गेलेलं आहेत."

"या विधेयकाला याक्षणी कोणतंही धार्मिक आधार नाही. या विधेयकाचा संबंध असल्यास तो इस्टेट आणि प्रॉपर्टीशी आहे. सरकारमधल्या काही लोकांनी आणि त्यांच्या उद्योगपतींना वक्फ बोर्डाच्या 2 लाख कोटीच्या जमिनी आपल्या घशात घालायच्या असल्यामुळे विधेयक आणलंय. आम्ही त्याला विरोध केला."

यासोबतच ते पुढे म्हणाले की, "मुस्लिमांच्या संपत्तीचे व्यापारीकरण करण्यासाठी हे विधेयक आणलंय. हे त्यांनाही माहित आहे. अमित शाहांच्या भाषणामध्ये हे वारंवार आलेलं आहे, आम्ही जमिनी विकू. जे पोटात होते ते ओठावर आलं ना. हे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशातल्या देवस्थानाच्या, धर्माच्या जमिनी हे ताब्यात घेऊन त्याच्यावरती आपल्या उद्योगपतींना टॉवर्स उभे करण्याची संधी देईल." असे संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : नाशिक येथे विद्यार्थ्यांमध्ये बेंचवरुन वाद, छातीत गुद्दे मारल्याने एकाचा जागीच मृत्यू

Nashik Crime : नाशिकमध्ये बेंचवरून झालेला वाद जीवघेणा ठरला; विद्यार्थ्यांच्या हाणामारीत, एकाचा मृत्यू तर दोन विद्यार्थी....

Rahul Gandhi : राहुल गांधी लवकरच करणार मोठा खुलासा! निवडणूक आयोगाबाबत अणुबॉम्बसारखी माहिती देणार असल्याचा दावा

MNS Panvel News : राज ठाकरेंच्या वक्तव्याची पनवेलमध्ये झळ; मनसे कार्यकर्त्यांकडून डान्सबारवर तोडफोड