रायगड, नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा अजून सुटलेला नाही आहे. पालकमंत्रिपदावरुन अनेक चर्चा सुरु आहेत. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "जर या राज्याचे मुख्यमंत्री गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिक आणि रायगड या प्रमुख जिल्ह्याला पालकमंत्री देऊ शकत नाही.
मी सांभाळेन म्हणतात, हे काय काय सांभाळणार आहेत? तुम्ही पालकमंत्र्यांचा तिढा सोडवू शकत नाही, तुम्ही काय राज्य चालवणार?" असे संजय राऊत म्हणाले.