ताज्या बातम्या

Sanjay Raut : प्रधानमंत्री मुंबईत येऊन 25 - 30 सभा घेतात, मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना

महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा आज शिवाजी पार्कवर होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज होणार आहे. राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार असून ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, प्रधानमंत्री मुंबईत येऊन महाराष्ट्रात येऊन 25 - 30 सभा घेतात. मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना. लोकांना मुर्ख बनवण्यासाठी तुम्ही आता सभा घेतायत. आपण तर विकास केला असता, आपण महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असत्या. तर अशाप्रकारे ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही असं सांगितले. त्यांना मांडीवर घेऊन बसावं नसते लागले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, जे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत ते स्वत:ला महाराष्ट्राचे स्वाभिमानी म्हणतायत. त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला म्हणत आहेत. ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्यावरती आज कौतुकांची फुलं उधळणार. हे चित्र महाराष्ट्राला एकदा याची देही याची डोळा पाहू द्या. म्हणून म्हटलं या निवडणुकीनंतर काही सुपारीची दुकानं बंद होणार. ती कायमची बंद होतील. असं संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा