ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत म्हणाले...

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले.

Published by : Siddhi Naringrekar

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, कालचा निकाल तुम्ही पाहा महायुतीचे जे लोक आहेत. ते अशा तऱ्हेने विजयाचा उत्सव साजरा करत आहेत. जणू काही महाराष्ट्र जिंकला. ज्याला राजकीय ज्ञान आहे, अक्कल आहे, सामान्य ज्ञान आहे. कालची जी निवडणूक झाली. त्याच्या अभ्यास केल्यावर तुम्हाला काय दिसेल. भारतीय जनता पक्षाच्या 103 आमदार आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांची लोक निवडून आणलं. त्यांची तेवढी ताकद होती. गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक होती. महाविकास आघाडीला काय फटका बसला. काँग्रेसनं काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला. शिवसेनेकडे कोटा नसतानासुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीने आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला. काँग्रेसची सात मतं फुटली. हे काय लपून राहिलेलं नाही. स्व:ता काँग्रेसचं अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं. 7 मत फुटली यातसुद्धा आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. ते आधीच फुटलेलं आहेत. मागच्या विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलेला आहे किंवा महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. हे मानण्याची गरज नाही. शिवसेनेचं एकही मत फुटले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची 12च्या 12 मत जयंत पाटील यांना पडलेली आहेत.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, काँग्रेसची जी 7 मत होतीत ती गेल्या 2 वर्षापासून काँग्रेसबरोबर नाहीत. हे कागदावर आहे आणि ती नावांसमोर सरळ आलेली आहे. याच 7 लोकांनी मागच्यावेळेस चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव केला. त्याच 7 लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला. त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्र जिंकला असे होत नाही. महाविकास आघाडी ही मजबूत आहे. महाविकास आघाडीने त्यांचे दोन्हीही उमेदवार निवडून आणलेलं आहेत. जयंतराव पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलं. जयंतराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची माननीय पवार साहेबांची सर्व मतं पडली आणि दुसऱ्या पसंतीची मतं ही जयंतराव पाटलांना आम्ही दिली थोड्या गणितामध्ये अशा प्रकारच्या चुका होतात. असे राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा