Sanjay Raut Lokshahi
ताज्या बातम्या

Sanjay Raut: खासदार संजय राऊतांचा ईडीवर हल्लाबोल; म्हणाले, "जो कोणताही नेता भाजपच्या विरोधात..."

"जोपर्यंत आरोपी आणि त्याचे कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत तुमच्या दहा लाखाला काही किंम्मत नाही. कावेरी नाखवा यांचा जीव दहा लाखांचा आहे का? "

Published by : Naresh Shende

Sanjay Raut Press Conference : ईडी काय सांगते यावरून कोणत्याही प्रकारचं आरोपपत्र बनत नाही. राजकीय दबावातून ते बनवतात. खालच्या कोर्टात स्पष्ट सांगितलं होतं की, अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही. हायकोर्टात त्यांच्या जामीनाला स्थगिती दिली आहे. आता सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरु राहील. ईडीकडे आता फॉर्मेट आहे. जो कोणताही नेता भाजपच्या विरोधात आहे, ईडी त्याच्यावर आरोपपत्र बनवणार. सीबीआय आणि ईडी भाजपच्या शाखा आहेत, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांसह भाजपवर निशाणा साधला.

विधानपरिषद निवडणुकीबाबत प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, आता कुणाचा फायदा कुणाला होतोय, ही बोलण्याची ही जागा नाही. पण शिवसेनेचे सर्व १५ आमदार बैठकीला उपस्थित होते. ग्रामीण भागातील काही आमदार मुंबईला पोहचू शकले नाही. शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत. शेकापचे भाई जयंत पाटील हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत. प्रज्ञा सातव सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. मला खात्री आहे, जी रणनीती आम्ही बनवली आहे, त्यानुसार तिनही उमेदवार उद्याच्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी होतील. कोण काय बोलतय हे सोडून द्या, त्यांनी आपापले आमदार सांभाळावेत.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप १६०-१७० जागा लढवण्यासाठी आग्रही आहे, अशी दिल्लीतही चर्चा आहे. यावर राऊत म्हणाले, हा त्या तीन पक्षांच्या चर्चेचा विषय आहे. कुणी किती जागवा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्यात जागवाटपावरून कोणताही ताणतणाव नसेल, हे मी खात्रीनं सांगू शकतो.

वरळी हिट अँड रन प्रकरणावर राऊत म्हणाले, जोपर्यंत आरोपी आणि त्याचे कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत तुमच्या दहा लाखाला काही किंम्मत नाही. कावेरी नाखवा यांचा जीव दहा लाखांचा आहे का? असं काही झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतात. ते खोक्यावाले आहेत. पैसे आले का वाटायचे. कायदा सुव्यवस्था या रस्तात नग्न झाली आहे. या राज्याचे गृहमंत्री मुंबईच्या या गंभीर घटनेबाबत संवेदनाही व्यक्त करत नाहीत. या राज्याला दुर्देवाने अशा प्रकारचा गृहमंत्री मिळाला आहे, असं म्हणत राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं

Ramdas Kadam On Thackeray Bandhu: राजकीय भूकंपाची शक्यता?; राज-उद्धव एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांचे खळबळजनक आरोप

Donald Trump : ट्रम्प यांचा मोठा विजय! ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर