महाराष्ट्रात आज 29 महापालिकांसाठी मतदान सुरू असताना आचारसंहितेच्या उल्लंघनाचे प्रकार समोर येत आहेत. कल्याण-डोंबिवलीत मतदानासाठी गेलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शर्टवर कमळाचे चिन्ह दिसल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
या घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरून निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत, “आयोग झोपलेला आहे की मुद्दाम दुर्लक्ष करत आहे?” असा थेट सवाल केला. आचारसंहिता मोडणाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या प्रकरणावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रतिक्रिया देत, तक्रारीची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे 29 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
संजय राऊत पोस्टमध्ये लिहिता की...
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रन लुंगीवाले छातीवर कमळ लावून मतदानास गेले हा आचार संहितेचा भंग आहे! यांच्यावर काय कारवाई होणार? मुख्यमंत्री ठेचून काढण्याची भाषा करतात काढा याना ठेचून
थोडक्यात
• महाराष्ट्रात आज 29 महापालिकांसाठी मतदान सुरू
• मतदानादरम्यान आचारसंहितेच्या उल्लंघनाचे प्रकार समोर येत आहेत
• कल्याण–डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मतदानासाठी दाखल
• मतदानाच्या वेळी त्यांच्या शर्टवर कमळाचे चिन्ह दिसल्याने वाद निर्माण
• आचारसंहितेच्या पालनावर प्रश्नचिन्ह, प्रकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात