पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. "चुनचुन के मारेंगे...', असे ते नेहमीच बोलतात. पण पुढं काय, युद्ध तर सुरू करा...," अशी टीका संजय राऊत केली आहेत. संजय राऊत म्हणाले की, "चुनचुन के मारेंगे..., एक को भी नही छोडेंगे', मुळात जे घडलंय त्याला जबाबदार गृहमंत्री आहेत. पहगाममध्ये जो प्रकार घडला आहे. त्याची जबाबदारी घेऊन अमित शाहांनी राजीनामा द्यायला हवा. ते राजीनामा देत नसतील, तर पंतप्रधानांनी त्यांना प्रायश्चित द्यायला हवं. कसलं समर्थन करताय चुकांचं, त्यांनी अमित शाहांच समर्थन करू नये. जर त्यांना अमित शाहांचा राजीनामा नकोय, तर महाराष्ट्रातील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून शरद पवार यांनी या राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामा घेतला. काँग्रेसनं विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला, हे विसरू नका."
"आता सरकारनं भारतीय सैन्यावर सर्व जबाबदारी टाकली. यापूर्वी अशा घटनांमध्ये इंदिरा गांधी यांनी सैन्यावर जबाबदारी टाकली नाही. आदेश दिला. मला युद्ध करायचं आहे. याला म्हणतात. राजकीय इच्छाशक्ती. तुमच्याकडं आहे का ती, अशा सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन, उडाणटप्पूपणाचं समर्थन आहे, टपोरीपणाच समर्थन आहे. यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर दिसतं नाही. काल पंतप्रधान मुंबईतील वेव्ज कार्यक्रमात उपस्थित होते. एखाद्या पंतप्रधानांही हा नट-नट्यांचा कार्यक्रम रद्द केला असता," असेही राऊत यांनी नमूद केले.