ताज्या बातम्या

'मोदींच्या बहिणीनेच सांगतलं, EVM मुळे निकाल बदलले जाऊ शकतात'; संजय राऊतांनी भाजपला डिवचलं

जो जितका पापी-पाखंडी असतो, तो हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतं, असे संजय राऊत निर्धार शिबिरातील भाषणात म्हणाले.

Published by : Rashmi Mane

नाशिकमधील शिवसेनेच्या निर्धार शिबिरात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ईव्हीएममधील घोटाळ्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत विविध विषयांवर सरकारला उद्देशून भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना संजय राऊत यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकते, ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात, असे मोदींच्या बहिणीनेच सांगितले आहे, असं म्हटलं.

पुढे संजय राऊत म्हणाले की, "आम्हाला मार्ग दाखवणारे उद्धव ठाकरे आहे. मी फक्त एवढेच सांगू इच्छितो. हे शिबीर नाशिकच्या शिवसैनिकांच्या मेहनतीने पार पडले आहे. ही शिवसेनेची ताकद आहे. आज आपल्याकडे सत्ता नाही. पण शिवसैनिकांनी मनावर घेतले तर शंभर सोहळे पार पडू शकतो. अनेकांना वाटत शिवसेनेचा पराभव झाला शिवसैनिक घराबाहेर पडणार. परंतू आजच्या शिबिराने दाखवून दिले की शिवसैनिक दणदणीत आणि खणखणीत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष आपण पाहिला. त्यात कवी कलश होते. त्यांना सुचत नव्हते, त्यांना कवी भूषणने एक मंत्र दिला. कवी भूषण सांगतो, मन के माने जित है, मन के माने हार... हार गये जो बिना लढे उन पर है धिक्कार, या ओळींची त्यांनी आठवण करून दिली."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य