पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेवर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी घटनेसंदर्भात बोलताना केंद्र सरकार निशाणा साधला असून या भ्याड हल्ल्याला देशाचे गृहमंत्रीच जबाबदारी आहेत, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला. केंद्र सरकार फक्त जोड-तोडचं राजकारण करत आहेत. कुठे सरकार बनवायचं, कुठे सरकार पाडायचं एवढचं काम केंद्र सरकार करत आहेत. त्यांनी देशाची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. त्यामुळे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेल्या अमित शाहांची राजीनाम्या द्यावा, असे संजय राऊत म्हणाले.