Sanjay Raut  Lokshahi
ताज्या बातम्या

"...तर सरकारवर दबाव आला असता"; टीम इंडियाच्या विजयोत्सवासाठी जमलेल्या गर्दीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

"ही गर्दी हुकूमशाही विरोधात रस्त्यावर उतरली , तर या देशात लोकतंत्र वाचेल. हुकूमशाही पूर्णपणे संपून जाईल"

Published by : Naresh Shende

Sanjay Raut On Maharashtra Government : टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये विजयी झेंडा फडकवून इतिहास रचला. वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या विजयी परेडसाठी शेकडो लोकांची गर्दी मुंबईच्या मरिन ड्राईव्ह परिसरता जमली होती. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता का? याबाबत संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, त्यापैकी १० टक्के लोक रस्त्यावर उतरले असते, तर महागाई, बरोजगारीसह इतर समस्या संपल्या असता. सरकारवर दबाव आला असता. पण ही गर्दी संकाटवेळी कुठे जाते? आम्हाला माहित नाही. ही गर्दी हुकूमशाही विरोधात रस्त्यावर उतरली , तर या देशात लोकतंत्र वाचेल. हुकूमशाही पूर्णपणे संपून जाईल.

पत्रकार परिषदेत संजय राऊत काय म्हणाले?

राहुल गांधींच्या नेतृत्वात जो तुफान आजही सुरु आहे, ज्याप्रकारे मिस्टर नायडू आणि नितीश कुमार यांची पार्टीत अस्वस्थता आहे. मोदींनी बहुमत गमावलं आहे. हे सरकार चालणार नाही, मला पूर्ण विश्वास आहे. लालूप्रसाद यादव यांनी जे म्हटलं आहे, ते बरोबर आहे. जिथे संकट आमि पिडा आहे, त्याठिकाणी भाजपचे नेते आणि गृहमंत्री जात नाहीत. राहुल गांधी आणि आम्ही जनतेत जातो आणि त्यांच्या वेदना समजून घेतो. आगामी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची बैठक झाली आहे का, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात इंडियाची महाविकास आघाडीची बैठक झाली आहे. महाराष्ट्राबद्दल खूप सकारात्मक चर्चा झाली.

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आम्ही सर्व एकत्रित निवडणूक लढणार आहेत. जागावाटपाचा यामध्ये काहीच मुद्दा नाहीय. टीम इंडियाच्या विजयी परेडबाबत मरिन ड्राईव्हवर लोकांची गर्दी जमली होती, त्यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता का? यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, त्यापैकी १० टक्के लोक रस्त्यावर उतरले असते, तर महागाई, बरोजगारीसह इतर समस्या संपल्या असता. सरकारवर दबाव आला असता. पण ही गर्दी संकाटवेळी कुठे जाते? आम्हाला माहित नाही. ही गर्दी हुकूमशाही विरोधात रस्त्यावर उतरली असती, तर या देशात लोकतंत्र वाचेल. हुकूमशाही पूर्णपणे संपून जाईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा