Sanjay Raut Lokshahi
ताज्या बातम्या

खासदार संजय राऊतांची PM नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका, म्हणाले; "५६ इंचची छाती असूनही..."

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. देशात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांवरून राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

Published by : Naresh Shende

Sanjay Raut On PM Narendra Modi : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. देशात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांवरून राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, ५६ इंचची छाती असूनही दररोज आमचे ५-१० सैनिक शहीद होत आहेत. तुम्ही सत्तेत बसण्याच्या लायक नाहीत. प्रधानमंत्र्यांना देशाच्या बाहेर राहणं पसंत आहेत. कारण देशातील समस्या सोडवण्यासाठी ते सकारात्मक नाहीत. त्यांना देशातील समस्यांचे निराकरण करायचं नाही. लोकांचा दबावही ते सहन करु शकत नाही. त्यांना बाहेर फिरायचं आहे, ते पिकनिकला जात असतात. त्यांना मजा करायची आहे. जे पुतीन लोकशाहीला मानत नाहीत, त्यांनी तिकडचा सर्व विरोधी पक्ष संपवून टाकला. ते एकतर जेलमध्ये आहेत, किंवा त्यांची हत्या करण्यात आली. पुतीन यांनी जर मोदींची वाहवा केली, तर यात नवीन काय आहे.

मुंबईच्या हिट अँड रन प्रकरणात आरोपीच्या वडिलांना जामीन मिळतं, आरोपी अजूनही फरार आहे, यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, आरोपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जवळचा व्यक्ती आहे. हे सर्वांना माहित आहे. तो एका जमान्यात त्यांच्या बिझनेस पार्टनर होता, असं मला वाटतं. ठाणे जिल्ह्यात त्यांच्यासाठी काम करत होता. कायदा कुठे आहे? कायदा जम्मू काश्मीरमध्ये आणि मणिपूरमध्ये नाही. कायदा महाराष्ट्रातही नाही आणि उत्तर प्रदेशातही नाही. जोपर्यंत हे सरकार चालू राहील, तोपर्यंत हिट अँड रनसारखी प्रकरणं होत राहतील आणि आरोपी २४ तासात बाहेर येतील.

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, पाच सैनिकांच्या हत्या झाल्या. आपण त्याला बलिदान म्हणूया. जवानांच्या ताफ्यावर एकूण सात हल्ले झाले आहेत. प्रधानमंत्री शपथ घेत होते, त्यावेळी जवानांवर हल्ले झाले आणि जवान शहीद झाले. आज पाच जवान शहीद झाले, त्यातील एक जवान महाराष्ट्राच्या अकोल्यातील आहे. वारंवार हल्ले होत आहेत. जम्मू काश्मीरची स्थिती नियंत्रणात आहे, अशी खोटी माहिती देशाचे गृहमंत्री अमित शहा देत आहेत. ३७० कलम हटवल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये अधिक अस्थिरता झाली आहे. जम्मू काश्मीरच्या विधानसभेला टाळं लागलं आहे. जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका घेऊ शकले नाहीत, असंही राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश