संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यादरम्यान त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर सुरु असलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया मांडली आहे. संजय राऊत म्हणाले की, "राजकारण करायला काही हरकत नाही पण आपण संविधानिक पदावर बसलो आहोत आणि आपल्याला या पदावर न्याय करण्यासाठी बसवलं गेलं आहे. पहिला शिवसेनेच्या बाबतीत नंतर राष्ट्रवादीच्या बाबतीत आणि आता माणिकराव कोकाटे यांच्याबाबतीत त्यांच्याकडून इमानदार निर्णयाची अपेक्षा करण म्हणजे रेड्यानं दुध देण्यासारख आहे. राऊतांनी सरकारवर खोचक टोला लगावला आहे".
हे सरकार विधानसभा अध्यक्षांच्या पाठिंब्याने चालत
पुढे संजय राऊत म्हणाले की, "भाजपकडे अनेक वेगवेगळे रेडे आहेत. आम्ही कायद्याच्या चौकटीत मागणी करु शकतो आणि भूमिका मांडू शकतो. पण आम्हाला माहित आहे एक बेकायदेशीर सरकार विधानसभा अध्यक्षांच्या पाठिंब्याने चालत, यापेक्षा वाईट संविधानाची तुडवा तुडवी काय असू शकते. राहुल गांधी आणि सुनिल केदार यांच्या वेळेस जसे निर्णय तडकाफडक घेतले गेले, तसे या आमदारांच्या वेळेस का नाही घेत?" राऊतांनी प्रश्न उपस्थित केला.
भाजपच्या नैतिकतेवर बोलताना संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली
तसेच पुढे म्हणाले की, "नैतिकता या सरकारच्या आसपास देखील कुठे फिरत नाही.ज्यावेळेस भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे पक्षाच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले त्यावेळेस उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी संजय राठोडचा राजीनामा घेतला. याला नैतिकता म्हणतात. मग आता कोर्टाने ज्यांना भ्रष्टाचारी ठरवलेलं आहे आणि कारवाई केली आहे त्यांच्या राजिनाम्यावर देवेंद्र फडणवीस गप्प का?" असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.