थोडक्यात
काल दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळण्यात आला.
या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला..
कालच्या सामन्यावरून संजय राऊतांचा संताप व्यक्त केला आहे.
Sanjay Raut On IND-PAK Match : काल दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळण्यात आला. या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. कालचा 'सामना खेळून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं'...सामन्यावर दीड लाख कोटींचा जुगार... 25 हजार कोटी पाकिस्तानला मिळाले... 'हे पैसे पाकिस्तान भारताविरोधात वापरणार-... कालच्या सामन्यावरून संजय राऊतांचा संताप व्यक्त केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, "दीड लाख कोटींचा जुगार , दीड लाख कोटीचं गॅबलिंग कालच्या मॅचवर झालं. अधिकृतपणे कालच्या सामन्यातले एक हजार कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले . दीड लाख कोटी जुगारातले किमान 25 हजार कोटी पाकिस्तानात गेले. मिळालेला हा पैसा पाकिस्तान भारताविरुद्ध वापरणार हे सरकारला कळतं नाही."
"कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1 हजार कोटी मिळाले, सरकारने पाकिस्तानला जागतिक बॅंकेकडून कर्ज मिळू नये, आयएमएफकडून कर्ज मिळू नये. एशिया डेव्हलपमेंट बॅंकेकडून कर्ज मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करत होतो. हा पैसा कर्ज रुपाने पाकिस्तानला जर मिळाला तर ते त्याचा उपयोग भारताविरुद्ध करतील अशी भारताची भूमिका होती. कालच्या मॅचमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी मिळाले हे कोणावर म्हणत, संजय राऊतांचा सवाल उपस्थितीत केला आहे."