महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणतात की, दुबार किंवा बनावट मतदान रोखण्याच्या नावाखाली काही विशिष्ट संघटनांवरच बोट दाखवले जात आहे. मुख्यमंत्र्यांचा रोख शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, सध्या सत्ताधारी गटातच पैशांच्या वाटपावरून अंतर्गत वाद सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले.
“सत्तेच्या छत्राखालीच एकमेकांवर हात उचलले जात असतील, तर त्याकडे दुर्लक्ष का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही मुंबईचे आणि मराठी माणसाचे हित जपण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आपला संदेश संपवताना संजय राऊत यांनी ठाम शब्दांत सांगितले की, लढा मुंबईसाठी आणि मराठी अस्मितेसाठीच आहे.
“जय महाराष्ट्र!” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
थोडक्यात
• दुबार किंवा बनावट मतदान रोखण्याच्या नावाखाली काही विशिष्ट संघटनांनाच लक्ष्य केलं जात असल्याचा संजय राऊत यांचा आरोप
• मुख्यमंत्र्यांचा रोख शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर असल्याचं राऊत म्हणाले
• कारवाईत पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर टीका
• सध्या सत्ताधारी गटातच पैशांच्या वाटपावरून अंतर्गत वाद सुरू असल्याचा दावा
• विरोधकांवर बोट दाखवण्याऐवजी आधी आपल्या घरात डोकावण्याचा सल्ला