ताज्या बातम्या

तर महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल,” संजय राऊत यांचं शिंदे गटातील आमदारांना आव्हान

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना लक्ष्य केल्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली.

Published by : Siddhi Naringrekar

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना लक्ष्य केल्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. संजय गायकवाड म्हणाले की, “आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे ‘****’ संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचं की पडायचं, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजपा म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे, पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू…”असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला होता.

त्यावर संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले की, “मला कोणी ‘गद्दार’ म्हटल्यावर शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. कारण ते ‘गद्दार’ आहेत. त्यांना उत्तम शिव्या देता येत असतील, तर सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपाचे राज्यपाल, प्रवक्ते मंत्री यांना द्यावात. आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवरती फुले उधळू. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्या, महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल,” असे राऊत म्हणाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...

Ind Vs Eng : हेझलवूडचा 'तो' सल्ला ऐकला अन् आकाश दीपने इंग्लंडचा फडशा पाडला

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र