bhagat singh koshyari, Sanjay Raut Team Lokshahi
ताज्या बातम्या

आतातरी राजभवनाचे भाजपा कार्यालय बनवू नका,संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला आहे. राज्याचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Published by : shweta walge

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला आहे. राज्याचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरच भाजपाचे एजंट म्हणून राजभवनातून राज्यपालांनी काम केले. राज्यपालांचा राजीनामा मंजूर करुन महाराष्ट्रावर उपकार केलेले नाहीत अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, राज्यपालांची हकालपट्टी यापूर्वीच करायला हवी होती. जर केंद्राने राज्यातील सामान्य जनतेचा आवाज ऐकला असता तर फार पूर्वीच राज्यपालांना घरचा रस्ता दाखविला गेला असता.

पुढे म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रिमंडळाच्या अनेक शिफारशी अमान्य केल्या. उदाहरणार्थ मविआच्या १२ आमदारांना त्यांनी मंजूरी द्यायला हवी होती, ती दिली नाही. अर्थात मी भगतसिंह कोशारी यांना दोष देत नाही. ते केंद्रीय गृह मंत्रालयाच्या दबावाखाली होते. व्यक्ती वाईट नसते, पण जेव्हा दबावाखाली काम करावे लागते, तेव्हा त्यांचा भगतसिंह कोश्यारी होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीमाई फुले यांच्याबाबत राज्यपालांनी जे वक्तव्य केले, त्यानंतर त्यांना तात्काळ हटविणे गरजेचे होते. पण केंद्र सरकारने ते केले नाही. राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण होऊ दिला. जेव्हा देशातील इतर राज्यपालांच्या नियमित बदल्या करायच्या होत्या, त्यात भगतसिंह कोश्यारी यांना बदलले.

महाराष्ट्राला आता नवे राज्यपाल मिळाले आहेत. रमेश बैस यांच्या नावात बैस आहे की बायस हे मला माहीत नाही. महाराष्ट्रात त्यांचे स्वागतच होईल आम्ही त्यांना सहकार्य करु. मी रमेश बैस यांना ओळखतो. त्यांनी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात काम केलेले आहे. ते सुस्वभावी आहेत. त्यांनी घटनेनुसार काम करावे. राजभवनाचे भाजप कार्यालय बनवू नये. लोकशाहीत विरोधकांचा आवाज देखील त्यांनी ऐकावे. तसेच ज्या राज्य सरकारची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे, ते राज्य सरकारच बेकायदेशीर आहे याचे भान नव्या राज्यपालांनी ठेवावे.” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर