अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आठवडा उलटला. मात्र, राज्य खातेवाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं होतं. अखेर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. याचपार्श्वभूमीवर संजय शिरसाट म्हणाले की, खातेवाटप झालं आणि त्यात मला मंत्री पद मिळाले मला मनस्वी आनंद आहे.
शिंदे साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे मी ती त्यांच्या प्रतिमेप्रमाणे पुर्ण करेन. आम्ही मिळालेली खाते पाहता समाधानी आहोत. त्यांची जशी कॉमनमॅनची प्रतिमा आहे त्याचप्रमाणे आम्ही देखील आमचं योगदान आमच्या कामांमध्ये देऊ. माझ्यावर सामाजिक न्याय या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय या खात्यात जेवढी आव्हणे आहेत ती आव्हाने पेलण्याचे काम मी करणार आहे.
'संभाजीनगरच पालकमंत्रिपद मलाच मिळणार'- संजय शिरसाट
आमचे दौरे देखील आता सुरु होणार आहेत मी आणि उद्योगमंत्री आम्ही परभणी आणि मसाजोग येथे जाणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी गुन्हे वाढत आहेत त्याप्रत्येक ठिकाणी वाढत्या गुन्हेगारीला आम्हाला आळा बसवायचा आहे. वातुस्थीतीचा बारकाईने अभ्यास करून त्याचा अहवाल मुख्यमंत्री यांच्याकडे देणार. 'संभाजीनगरच पालकमंत्रिपद मलाच मिळणार आहे आणि पालकमंत्रिपद मी होणार आहे'. चुकीचे कामे केले असतील तर कारवाई केली जाईल, कुणी पालकमंत्री असो किंवा मंत्री असो शासकीय निधीचा गैरवापर नको.