ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'साठी इतर खात्यातील निधीवर डल्ला; महायुतीतील मंत्र्यांनी केली खदखद व्यक्त

राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पाया रचल्यामुळेच महायुती पुन्हा सत्तेत आल्याचे बोलले जाते.

Published by : Rashmi Mane

राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) पाया रचल्यामुळेच महायुती पुन्हा सत्तेत आल्याचे बोलले जाते. मात्र या योजनेसाठी सरकारी खजिना रिता केल्यांची ओरड वारंवार सत्ताधारी नेत्यांकडून होत असल्याचे समोर आले आहे. त्यातच आज, शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shivsena) सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पत्रकार परिषद घेत सरकारी निधीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला गेल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असणाऱ्या अर्थ खात्यावरच शिरसाट यांनी थेट आरोप केला आहे. शिवाय याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, शिरसाट यांच्या आरोपांना दुजोरा देत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीदेखील लाडकी बहीण योजनेमुळे खात्यातील निधीबाबत मोठी कसरत होत असल्याचे म्हटले आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, "लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीच्या बाबतीत कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या बजेटमध्ये ज्या पद्धतीची निधीची उपलब्धता इतर विभागांना व्हायला हवी होती ती झाली नाही. यामुळे आमच्या सर्वांचीच थोडीशी अडचण झाली आहे. पहिल्या टप्प्यात काही धावपळ झाली आहे. आता गाडी रुळावर येईल. लाडकी बहीणच नाही, तर ज्या-ज्या योजना दिल्या आहेत. त्यासाठीच्या निधीची उपलब्धता पुढच्या टप्प्यात होईल."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज