ताज्या बातम्या

Sanjay Shirsat : "हि निवडणूक महायुतीत लढवायची मात्र काही जण छळ कपट करतात" महायुतीतील अंतर्गत कुरघोडींवर शिरसाठांच मोठ विधान

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा गटप्रमुख मेळावा पार पडला. यादरम्यान बोलताना शिंदेंच्या शिवसेनेतील नेते आणि मंत्री संजय शिरसाठ यांनी मोठं विधान केलं आहे.

Published by : Prachi Nate

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा गटप्रमुख मेळावा पार पडला. यादरम्यान बोलताना शिंदेंच्या शिवसेनेतील नेते आणि मंत्री संजय शिरसाठ यांनी मोठं विधान केलं आहे. गेले काही दिवस महायूतीत अंतर्गत मतभेद पाहायला मिळत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महायूतीत भाजप आणि शिवसेनेत बरेच वाद पाहायला मिळत आहे.

दरम्यान शिंदेंच्या मेळाव्यात शिवसेना अंतर्गत कुरघोडीवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, " हि निवडणूक महायुतीत लढवायची मात्र काही जण छळ कपट करतात. आपल्यातील काही लोकांना वाटते महायुती होऊ नये, महायुतीला एवढे भरभरून मत दिले आहे. महायुती तुटू नये". संजय शिरसाट यांनी हा टोला नेमका कोणाला लगावला असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हा टोला रविंद्र धंगेकरांना मारला असल्याची शक्यता वर्तावली जात आहे. कारण अलिकडेच धंगेकरांनी घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावरुन भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. यावरुन भाजप नेत्यांमध्ये नाराजी पसरलेली पाहायला मिळाली.

तसेच पुढे शिरसाट म्हणाले की,"आमच्याकडे शिवसैनिक असा आहे. एक आवाज दिला की शिवसैनिक हजर होतो.. त्यांना दिले काय, त्यांना मिळाले काय याची चर्चा कधीही केलेली नाही. पूर्वी निवडणूक लागली की, जय भवानी जय शिवाजी म्हटले की आपल्या अंगात यायचं.मात्र आता कार्यपद्धती बदलली आहे. सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकायच्या आहेत असा सज्जड दम एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिला आहे. आम्ही तन मन आणि धनाने तुमच्या सोबतच आहोत. पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड नगरपरिषद आपल्या हातात होती".

पुढे आदित्य ठाकरेला पेंग्विन म्हणून उल्लेख करत मविआवर टीका करत शिरसाट म्हणाले की, "बाप अखेर बाप होता है.. सगळे गेले साफ झाला, जिल्ह्यात आमदार ना, खासदार. खैरे आणि दानवे दोनच नेते राहिले आहे. ते एकमेकांविरोधात हंबरडा फोडतील. हे अपशकुनी आहेत. यांना पक्षात घेऊ नका..."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा