ताज्या बातम्या

Sant Tukaram Pagdi to PM Modi: पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पुण्यात बनवण्यात आली खास 'संत तुकाराम पगडी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे.

Published by : Dhanshree Shintre

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. मोदींसाठी पुण्यात खास संत तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज हे नाव पुण्यातील विमानतळाला दिलं जाणार आहे. याविषयीचा निर्णय नुकताच झाला आहे त्यामुळे आता मोदींसाठी खास संत तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे.

दरवेळी मोदींच्या पुणे दौऱ्यातील पगडी चर्चेचा विषय ठरते. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी ही हटके पगडी तयार केली आहे. वारकरी संप्रदाय आणि अठरा पगड जातींना साद घालण्याचा प्रयत्न या पगडीमार्फत मोदींकडून करण्यात येणार आहे.

दरम्यान, येणाऱ्या काही काळामध्ये विधानसभेच्या निवडणूका आहेत आणि काही दिवसांमध्ये साची घोषणा होत असताना आता वारकरी संप्रदाय आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी खूश करण्यासाठी त्यांना साद घालण्यासाठी ही पगडी मोदी आता परिधान करणार आहेत अशी चर्चा रंगली आहे. मोदींच्या स्पेशल पगडीची पहिली झलक लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा