ताज्या बातम्या

शिंदे गटाच्या आमदाराची अधिकाऱ्याला पुन्हा धमकी; ‘...तर तुम्हाला पायाखाली तुडविल’

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

Published by : shweta walge

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यांमध्ये कळमनुरीतील एसटीने शाळेत जाणाऱ्या काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनीच्या तक्रारीनंतर एसटी कंडक्टरला शिवीगाळ केल्याचे दिसत आहे. एवढचं नाही तर काम व्यवस्थित केले नाही, तर मारहाण करण्याचीही धमकी त्यांनी दिली आहे.

कळमनुरीतील एसटीने शाळेत जाणाऱ्या काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एसटीच्या कंडक्टरच्या गैरवर्तणुकीविषयी बांगर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर सर्व विद्यार्थ्यांना घेऊन बांगर यांनी थेट एसटी आगार प्रमुखांना आपल्या कार्यालयात बोलवले. त्यानंतर एसटी वेळेत न आल्याने घरी जायलाही उशीर होतो. एसटी कंडक्टर विद्यार्थ्यांशी नीट बोलत नाही, गाडीतून खाली उतरवण्याची धमकी देतो, अशा तक्रारी विद्यार्थिनींनी बांगर आणि आगार प्रमुखांसमोर मांडल्या.

त्यावर अॅक्शन घेत बांगर यांनी आगार प्रमुखांना शाळा सुटण्याच्या ठीक वेळेतच विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध झालीच पाहिजे, आणि विद्यार्थ्यांसाठी चांगला कंडक्टर द्या, कंडक्टर विद्यार्थ्यांशी नीट बोलत नसतील तर त्याला पायाखालीच तुडवील असा थेट इशारा दिला आहे.

दरम्यान, या अगोदरही संतोष बांगर यांनी सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांना कायम धारेवर धरलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा