बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो ट्विट करत म्हणाले आहे की, संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील?
याच विघ्ने याने निवडणूक काळात धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलेले आहे. दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराडचा आत्यंत खास माणूस असून गेले १० वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.