ताज्या बातम्या

संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक

बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विकास माने, बीड

बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.

अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आरोपींना पळून जाण्यास ज्याने मदत केली होती, त्याला आधी पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

देशमुख हत्या प्रकरणानंतर तीन आरोपी फरार होते त्यातील या दोघांना आज अटक झाल्याची माहिती आहे. सीआयडीकडे चौकशीसाठी ताब्यात देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shiv Sena UBT Dasara Melava | Uddhav Thackeray : कर्जमाफी ते राज-उद्धव युतीवरुन उद्धव ठाकरेंनी सरकारला ठणकावलं

Eknath Shinde On Uddhav Thackeray : "तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये...." सुरतच्या मेळाव्याबाबत एकनाथ शिंदेचं प्रत्युत्तर

Eknath Shinde Dasara Melava Speech : लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य म्हणाले की...

Eknath Shinde On Uddhav Thackeray : "हे पक्षप्रमुख नाही हे ...." एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र