ताज्या बातम्या

Santosh Ladda Robbery Case : मोठी बातमी! लड्डा दरोडा प्रकरणात मुख्य आरोपीचा एन्काउंटरपूर्वी 9 लाखांचा जमीन व्यवहार

लड्डा दरोडा प्रकरण: एन्काउंटरपूर्वी 9 लाखांचा प्लॉट खरेदी, रोहिणीवर आर्थिक पाठबळाचा ठपका.

Published by : Team Lokshahi

Santosh Ladda Robbery Case : उद्योजक संतोष लड्डा दरोड्याप्रकरणी मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाला. एन्काउंटर होण्याआधी काही तास पडेगाव येथे 9 लाख रुपयांची जमीन खरेदी केली होती. हा प्लॉट त्याने बहिणी रोहिणी खोतकरच्या नावावर घेतला होता. पोलिसांनी चौकशीत केली असता, व्यवहारात 9 लाख रुपये जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

15 मे रोजी लड्डांचे कुटुंब विदेशात असताना त्यांच्या बंगल्यात दरोडा पडला. त्यात 5.9 किलो सोने आणि 32 किलो चांदी लुटण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 21 आरोपींना अटक केली आहे. अमोल खोतकर हा दरोड्याचा मुख्य सूत्रधार होता. तो एन्काउंटरपुर्वी खुशी हिच्यासोबत राहात होता. पोलिसांनी चौकशी केली असता, सोने कुठे विकले?, त्यातून किती रक्कम मिळाली?, प्लॉट कुठे खरेदी केला? प्रकरणाचे अनेक पैलू उलगडले.

प्लॉट खरेदीचा व्यवहार

26 मे रोजी दुपारी, एन्काउंटरपुर्वी अमोलने स्वतः उपस्थित राहून पडेगाव रेल्वे रुळाजवळील एक प्लॉट 9 लाख रुपयांना खरेदी केला. हा प्लॉट रोहिणीच्या नावावर घेतला गेला. याच भूमिकेमुळे रोहिणीवर गुन्ह्याला आर्थिक पाठबळ पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आला असून २४ जून रोजी तिची अटक करण्यात आली.

रोहिणीचा मित्र पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे रोहिणीचा मित्र रणजीत. मूळचा बंगळुरूचा असलेला रणजीत सध्या गोव्यातील कॅसिनोमध्ये नोकरी करत आहे. रोहिणी आणि रणजीतची ओळख ऑक्टोबर 2024 मध्ये गोव्यात झाली होती. त्यांनी 26 जून रोजी विवाह करण्याचे ठरवले होते. मात्र, याच दिवशी रोहिणीला हर्मूल कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाने रणजीतला गोव्यातून ताब्यात घेऊन, शुक्रवारी दोन पथकांनी त्याची कसून चौकशी केली. रोहिणीने गुन्ह्याशी संबंधित माहिती त्याच्याशी शेअर केली असण्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाच्या तपासात अमोलच्या मृत्यूनंतरही अनेक धागेदोरे उलगडत आहेत. रोहिणीची भूमिका, जमीन खरेदी व्यवहार, रणजीतसोबतचे संबंध, आणि अद्याप न मिळालेल्या सोन्याचा तपास, हे सर्व पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू