राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पाहायला मिळत आहे. विशेषत: मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पिकं पाण्यात बुडाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला.याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
त्यावेळी त्या म्हणाल्या की, "पावसाची तीव्रता वाढण्याच्या आधी सरकारने काळजी घ्यायला पाहिजे. अशी मागणी असणारे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. की, तातडीने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे."