ताज्या बातम्या

'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये 11 वर्षीय सार्थ गांधीची नोंद; केला 'हा' अद्वितीय बौद्धिक पराक्रम

सातत्यपूर्ण प्रोत्साहन, वाचनाची आवड आणि कौटुंबिक पाठिंब्याचं मूर्त उदाहरण ठरत आहे.

Published by : Team Lokshahi

अवघ्या ११ वर्षांचा सार्थ सिद्धार्थ गांधी याने केलेला अद्वितीय बौद्धिक पराक्रम आता 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदवला गेला आहे. त्याने १ ते २०० पर्यंतच्या संख्यांचे वर्ग फक्त ६ मिनिटे ५६ सेकंदात उच्चारून हा विक्रम केला. छत्रपती संभाजीनगर येथील श्रीमती रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात रेकॉर्ड प्रतिनिधी रेखा सिंग यांच्या हस्ते सार्थला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

सार्थला लहानपणापासून वाचनाची आवड असून, एकदा वाचले की ते त्याच्या लक्षात राहते. त्याची आई डॉ. सायली गांधी यांनी वेगवेगळ्या शैक्षणिक खेळांद्वारे त्याच्या अभ्यासात रुची निर्माण केली. आज तो इतिहास, धार्मिक ग्रंथ यांचंही वाचन करतो आणि त्यातील संदर्भ त्याला सहज आठवतात. सार्थ हा मराठवाड्यातील प्रसिद्ध उद्योगपती अजय गांधी आणि समाजसेविका तनुजा गांधी यांचा नातू असून, त्याच्या या बुद्धिमत्तेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

"मुलांना टीव्ही, मोबाइलपासून दूर ठेवून वाचन आणि खेळांमध्ये रस निर्माण केला, त्यामुळेच सार्थ आज अशा यशाला पोहोचला आहे," असं मत त्याची आई डॉ. सायली गांधी यांनी व्यक्त केलं. हा विक्रम केवळ बुद्धिमत्तेचा नव्हे, तर सातत्यपूर्ण प्रोत्साहन, वाचनाची आवड आणि कौटुंबिक पाठिंब्याचं मूर्त उदाहरण ठरत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा