ताज्या बातम्या

IPL 2025 RCB Fans : 'या' पठ्ठ्यांन केली टीम जिंकण्यासाठी पैशाची मागणी; चाहत्यांनीही दिला उत्स्फूर्त प्रतिसाद; जमवले 'इतके' पैसे

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2025) उत्सव देशभरात जोशात सुरू आहे आणि त्यातच एका तरुणाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) फॅन्ससोबत केलेला भन्नाट प्रॅंक (Prank) सोशल मीडियावर तुफान गाजतो आहे.

Published by : Rashmi Mane

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2025) उत्सव देशभरात जोशात सुरू आहे आणि त्यातच एका तरुणाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) फॅन्ससोबत केलेला भन्नाट प्रॅंक (Prank) सोशल मीडियावर तुफान गाजतो आहे. "RCB साठी 10 रुपये दान करा", अशा मजकुराचे पोस्टर्स लावून या तरुणाने चाहत्यांना QR Code द्वारे पैसे दान करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे अनेकांनी या 'Fake' मोहिमेला प्रतिसाद दिला. अशा पद्धतीने लोकांकडून पैसे गोळा करणे हा प्रँक आहे का, फ्राड (Fraud) अशाही प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकार?

RCB म्हणजे एक असा संघ जो आजवर एकदाही IPL ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. तरीही त्यांच्या चाहत्यांमध्ये मात्र अजिबात टीमविषयीची भावना कमी झालेली नाही. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात किंवा त्याच्या उपस्थितीत संघ मैदानात उतरला की, चाहते थेट स्टेडियममध्ये किंवा सोशल मीडियावर (Social Media) झडप घालतात. पण हाच उत्साह कधी-कधी त्यांच्यासाठी महागात पडू शकतो, हेच या प्रॅंकने दाखवून दिलं.

या प्रॅंकमध्ये एक तरुण शहरात काही ठिकाणी RCB च्या नावाने पोस्टर्स लावतो. पोस्टरवर मोठ्या अक्षरात लिहिलंय "RCB च्या गूडलकसाठी 10 रुपये दान करा" आणि त्याखाली एक UPI QR Code देखील असतो. हा QR Code वर स्कॅन करून अनेक चाहत्यांनी अक्षरशः खिशातून पैसे काढून पाठवले.

दिवसभरात गोळा झाले 1200 रुपये

या व्हिडीओच्या शेवटी तरुण सांगतो की, "RCB फॅन्सनी दिवसभरात एकूण 1200 रुपये दान केले. म्हणजेच हा प्रॅंक यशस्वी ठरला आणि एकाच दिवसात सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला." हा व्हिडीओ sarthaksachdevva या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत तब्बल 1.28 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूज (Views) या व्हिडीओला मिळाले आहेत. नेटिझन्सनी व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी RCB फॅन्सची खिल्ली उडवली आहे.

नेटिझन्सनी घेतली मजा

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी लिहिलंय, "RCB फॅन्सना गंडवणं इतकं सोपं आहे का?", तर काहींनी म्हटलं, "हे पाहून तरी संघ एकदातरी ट्रॉफी जिंकावा". काहींनी मात्र प्रॅंक करणाऱ्या तरुणाचं कौतुक केलं आणि त्याच्या कल्पकतेचं भरभरून कौतुक केलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा