ताज्या बातम्या

Satara Crime : साताऱ्यातील माथेफिरू तरुणाचा एकतर्फी प्रेमातून मुलीवर हल्ला ; Video Viral

एकतर्फी प्रेमाच्या नादात तरुणाचा शाळकरी मुलीवर हल्ला; पोलिसांनी घेतले ताब्यात

Published by : Team Lokshahi

खऱ्याखुऱ्या चित्रपटाच्या कथानकाला ही लाजवेल असा फिल्मी सीन साताऱ्यात पहायला मिळाला. साताऱ्यातील एका माथेफिरू तरुणाने शाळेतील एका मुलीच्या गळ्याला चालू लावला.या अचानक झालेल्या घटनेमुळे तेथील परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान राखून वेळीच योग्य ती पावले उचलल्यामुळे सदर मुलीचा जीव वाचला आणि अघटित घटना टळली.

एकतर्फी प्रेमातून आजपर्यत अनेक प्रेमी युगुलांनी आपल्या प्रियकर प्रेयसीची हत्या केल्याची अनेक घटना आहेत. आजकाल एकतर्फी प्रेम म्हणजे स्टाईल स्टेट्स बनले आहेत. कित्येक तरुण तरुणींनी याप्रकरणात आपला जीव गमावला. अशीच एक घटना साताऱ्यामध्ये घडली. सातारतील बसप्पापेठ करंजे परिसरात अश्याच एकतर्फी प्रेमाच्या नादात एका माथेफिरू तरुणाने एका शाळकरी अल्पवयीन मुलीला भर रस्त्यामध्ये गाठून तिच्या गळ्यावर चाकू धरला.तो तरुण तिला संपवण्याच्या प्रयत्नात असताना आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ त्या मुलाला पकडले आणि त्याला जबरदस्त चोप दिला.

याआधी सुद्धा त्याने त्या मुलीला बराच त्रास दिला होता. मात्र आज त्याच्या रागाने परिसीमा गाठत हे भयानक पाऊल उचलले. ही घटना जिथे घडली त्या परिसरातील लोकांनी त्या युवकाला मुलीला सोडण्याची विनंती केली मात्र त्या माथेफिरू युवकाने त्यांचे ना ऐकता त्यांना बाजूला होण्यास सांगितले. काही हुशार नागरिकांनी काही अघटित घडू नये यासाठी त्या युवकाला मागच्या बाजूने पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या हातातून चाकू काढून घेतला. वेळीच लोकांनी निर्णय घेऊन त्या युवकाला अडवल्यामुळे त्या निरागस मुलीचा जीव वाचला. त्या मुलाच्या हातून चाकू काढून घेतल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने त्या युवकाला जबरदस्त मारहाण केली. तात्कळ पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलीस सागर निकम, धीरज मोरे, उमेश आडागळे अमोल इंगवले यांनी माथेफिरू युवकाला ताब्यात घेतले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा शाळकरी आणि महाविद्यालयातील तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसाढवळ्या अश्याप्रकारे लहान मुलींवर हल्ले होत असल्यामुळे आता पोलीस प्रशासनानेही याकडे जास्त लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST : 'या' पाच राज्यांचं एकूण जीएसटीत 50 टक्के योगदान; उत्तर प्रदेश आघाडीवर, तर महाराष्ट्राचाही समावेश

Latest Marathi News Update live : माणिकराव कोकाटे यांची आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद

Nurses Strike : ससून रुग्णालयाला परिचारिकांच्या संपाचा फटका; रुग्णसेवेवर परिणाम

Jalindar Supekar : जालिंदर सुपेकर यांना 448 कोटींच्या कारागृह खरेदीप्रकरणी क्लीन चीट