ताज्या बातम्या

Crime | दीड लाख रुपयांचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक

सातारा (satara) शहर पोलिसांना एसटी स्टँड परिसरामध्ये एक 22 वर्षीय तरुण पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला.

Published by : Shweta Chavan-Zagade

सातारा (satara) शहर पोलिसांना एसटी स्टँड परिसरामध्ये एक 22 वर्षीय तरुण पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला. यावेळी शहर पोलिसांना पारंगे चौक ते पोवई नाका जाणाऱ्या रस्त्यावर एक संशयित जात असल्याचे आढळले. त्यानंतर त्या तरुणाला पोलिसांनी हटकले असता तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि 50 हजार रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि 120 रुपये रोख रक्कम मिळून आली.

त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि रिवाल्वर हस्तगत करत सुरज मुन्ना शेख या 22 वर्षीय युवकाला बेकायदेशीर विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेत त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा