Sushma Andharen Sushma Andharen
ताज्या बातम्या

Sushma Andharen : साताऱ्यातील ड्रग्स प्रकरण, बदनामी करणाऱ्याला कायदेशीर..., प्रकाश शिंदेंचा सुषमा अंधारेना इशारा

साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंच्या टार्गेटवर प्रकाश शिंदे... ड्रग्ज प्रकरणी प्रकाश शिंदे आज माध्यमांशी साधणार संवाद...

Published by : Riddhi Vanne

Sushma Andhare on Eknath Shinde Brother: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाशी संबंधित एका रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे १४५ कोटी रुपयांचे ड्रग्ज या ठिकाणी आढळले असून साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी ही माहिती दडपल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याचपार्श्वभूमीवर आता प्रकाश शिंदे हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच बदनामी करणाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवणार असा इशारा प्रकाश शिंदेंनी सुषमा अंधारेंना दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असलेल्या सावरी गावातील एका रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत तब्बल ४५ किलो ड्रग्ज सापडल्याचं सांगण्यात येत आहे. हा रिसॉर्ट प्रकाश शिंदे चालवत असल्याचा आरोप असून, प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

दरम्यान, १३ डिसेंबर रोजी मुंबई गुन्हे शाखेने सावरी गावात सकाळच्या सुमारास कारवाई करत मेफेड्रॉन या अंमली पदार्थाच्या निर्मितीचं ठिकाण उद्ध्वस्त केलं होतं. या कारवाईत अंदाजे ११५ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी विशाल मोरे याच्यासह आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

याआधी ९ डिसेंबर रोजी मुलुंड परिसरात दोन जणांकडून १३६ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं होतं. त्यांची चौकशी केल्यानंतर विशाल मोरे आणि इतर आरोपींची नावे समोर आली. पुढील तपासात सावरी गावातील ती जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्ती किंवा नातेवाईकांशी संबंधित असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पोलिसांनी त्यावेळी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. आता पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी ही जागा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाची असल्याचा दावा केल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा