सतीश भोसले उर्फ खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काल कारागृहाच्या समोरच नातेवाईकांनी आणलेला जेवणाचा डबा खात असतानाचा खोक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांनी यावर ॲक्शन घेतली असून जे पोलीस कर्मचारी सतीश भोसलेला व्हीआयपी ट्रीटमेंट देत होते त्या 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.